मॉडर्न विकास मंडळ, पुणे या संस्थेच्या वतीने सलग १८ व्या वर्षी ‘गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी लक्ष्मी रस्त्यावरील “विजय टॉकीज चौक” येथे गणेश भक्तांसाठी “मोफत तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र” दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. ते २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. पर्यंत कार्यरत होते. या मोफत तातडीचे वैद्यकीय सेवेचा लाभ २८ रुग्णांनी घेतला. यामध्ये चक्कर येऊन पडणे, डी हायड्रेशन, हाताला पायाला जखमा, गुदमरुन दम लागणे अशा प्रकारच्या रुग्णांना सेवा देण्यात आली.

रुद्र पिसाळ (चेस्ट पेन) व ऐश्वर्या मेहता (पायावरुन रथाचे चाक गेले) या २ पेशंटला ॲम्ब्युलन्सने पेशंटच्या इच्छेप्रमाणे पुना हॉस्पिटलमध्ये ॲडमीट केले.

अधिक वाचा  आजचा दिवस ‘मराठा आरक्षण’ अतिमहत्वाचा; ‘ही’ पिटीशन सरन्यायाधीश चंद्रचूडांच्या दालनात सुनावणी

या वैद्यकीय सेवेकरीता डॉ. संदीप बुटाला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रियांक जावळे, डॉ. भारती आवारे, डॉ. तुषार जगताप, डॉ. प्रशांत बोऱ्हाडे, डॉ. धर्मेंद्र शहा, डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. निलम सुतार, डॉ. मनिषा जाधव, डॉ. संजय बुटाला, यांनी रुग्णाची तपासणी केली. या वैद्यकीय सेवा केंद्राचे उद्घाटन मा.नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व बालरोग तज्ञ डॉ. राम धोंगडे, भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस मुरलीधरजी मोहोळ, भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेशजी पांडे, भाजपा शहर सरचिटणीस पुनीतजी जोशी, आरपीआय महाराष्ट्र कार्यकारणी सभासद अॅड. मंदारभाऊ जोशी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीपजी खर्डेकर, मा. राजेशजी येनपुरे, मा. समीरजी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

अधिक वाचा  चक्रीवादळामुळे रद्द झालेली इंडिया आघाडीच्या बैठकीची तारीख ठरली आता 7 डिसेंबरला होणार बैठक

सौ. मनिषा बुटाला, बळीराम भडकवाड, योगेश मराठे, मधुकर शिंदे, मदन गायधने, सुयश बुटाला, शत्रुघ्न ओझरकर, भरत मराठे, दिलीप घोलप, विलास मोहोळ, मनिष कदम, नानासाहेब ओव्हाळ यांनी विशेष योगदान दिले.