भारताने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्स राखून पराभव करत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारत हा आता कसोटी आणि टी 20 पाठोपाठ वनडेमध्ये देखील नंबर वन ठरला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा आता आशिया मधील पहिला संघ ठरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचे 277 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाला खाली खेचत वनडे टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.

अधिक वाचा  ‘असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे…’, विधानसभा निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेच नवं गाणं लाँच!

भारतीय संघाने 42 सामन्यात 4864 पॉईंट्स अन् 116 रेटिंग पॉईंट्स मिळवत अव्वल स्थान गाठले. भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ही अव्वल स्थानाची रस्सीखेच भारताने अवघ्या 1 गुणाने सध्या तरी जिंकली आहे. पाकिस्तानचे 29 सामन्यात 3231 पॉईंट्स आणि 115 रेटिंग पॉईंट्स आहेत. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

भारताने कसोटी आणि टी 20 मध्ये देखील टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेबाबत बोलायचं झालं तर भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना हा 24 सप्टेंबरला इंदौर येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा सामना हा 27 सप्टेंबरला राजकोट येथे होणार आहे.