किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ समोर आणल्याप्रकरणी एका मराठी वृत्त वाहिनीला माहिती प्रचारण मंत्रालयाने शिक्षा सुनावली आहे. वाहिनीला ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं होते. ज्यानंतर आता विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांचे असे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचा दावा देखील या वृत्तवाहिनीने केला आहे. सोमय्यांबाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संपूर्ण मुद्द्यावरुन एकीकडे विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेले असले तरी भाजपकडून कोणत्याही नेत्याचा प्रतिक्रियाही समोर आलेल्या नाही.
केंद्रीय स्तरावरती याची योग्य दखल घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज मराठीतील नावाजलेल्या या वृत्तवाहिनीला सलग ७२ तास म्हणजेच सलग तीन दिवस आपले प्रसारण बंद ठेवावे लागणार आहे.
मुळात हा व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्याची गरज असताना याबाबत प्राथमिक पोलीस अहवालही आला अन् त्यामध्ये हा व्हिडिओ खरा असल्याचेही नमूद करण्यात आलेले होते परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आलेले माहिती प्रसारण मंत्रालयाचे हे आदेश कोणत्या राजकीय दबावत आहेत की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा प्रसारमाध्यमांना देण्यात आलेला संदेश आहे की काय असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.