आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. स्कील डेव्हलपमेंट घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे.

या प्रकरणी नायडू यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. तर सरकारतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. गुन्हा दाखल झाला असेल तर त्याची चौकशी होऊ द्या, असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला होता.

चंद्राबाबू नायडू यांना 9 सप्टेंबर रोजी स्कील डेव्हलपमेंट निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यामुळे सरकारी तिजोरीचे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. नायडू सध्या राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहात आहेत. आंध्र प्रदेश न्यायालयाने नायडू यांना दोन दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. विशेष सरकारी वकील वाय.एन. विवेकानंद म्हणाले की, एसीबीच्या विशेष न्यायालयाने नायडू यांना 23 आणि 24 सप्टेंबर या दोन दिवसांच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीत पाठवले आहे.

अधिक वाचा  लवकरच भारत चंद्रावर पाठवणार माणूस; पंतप्रधान मोदींनी दिली माहिती