भारतीय संघाने नुकताच आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आता येणारे पुढील वर्ष भारतीय संघासाठी महत्वाचे आहे. कारण भविष्यात आता आशियाई सामना आणि वन डे वर्ल्ड कप 2023 ही खेळायचा आहे. त्यामुळे आता बीसीसीआयनेही भारतीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयकडून संघ जाहीर करण्यात आला असला तरी विश्वचषकाचे खरे दावेदार समजल्या जाणाऱ्या चार खेळाडूंनाच संघातून डावलण्यात आले आहे. त्यांच्यासाठी वर्ल्ड कपही आता दूर राहिला आहे.

भारतीय संघात धक्कादायक म्हणजे ज्याला सलामीवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनलाही दोन्ही संघातून बाजूला ठेवण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी धवनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याला डावलून आता ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद देण्यात आले आहे.

अधिक वाचा  कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमरांसह ३ मंत्र्यांचे राजीनामे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे सोपवला

शिखर धवनला धक्का
शिखर धवनला संघातून बाजूला ठेवल्यानंतर त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, बीसीसीआयच्या निर्णयाचा मलाही धक्का बसला होता. मात्र आता बीसीसीआयने माझा काही तरी वेगळा विचार केला असेल असं वाटलं. त्यातच ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद देण्यात आल्याने त्या गोष्टीचा आनंदच आहे.

फिरकीपटूच संघाबाहेर
ज्या प्रमाणे शिखर धवनला संघातून बाजूला ठेवल्यानंतर त्याच्याप्रमाणेच अनेका क्रिकेटप्रेमींना धक्का बसला होता. त्याच प्रमाणे युजवेंद्र चहलही बाजूला गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलची अवस्थाही अशीच आहे. आशिया चषकापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर चहलचा वनडे मालिकेत समावेश केला होता मात्र त्यानंतर त्याची विश्वचषकसाठीही त्याची निवड होईल अशी शक्यता होती. मात्र विश्वचषकाबरोबरच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याची निवड करण्यात आली नव्हती. तर आशियाई स्पर्धेतूनही त्याला बाहेर ठेवण्यात आले होते.

अधिक वाचा  डॉ. प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला; प्रथमदर्शनी पुरावा दिसून येत आहे: न्यायालय

संजू सॅमसनही आऊट
त्यातच संजू सॅमसनही क्रिकेटच्या विश्वात तो स्वतःला सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे संजू सॅमसनसाठी विश्वचषकाचे दरवाजे बंद करण्यात आले. तसेच त्याला आशियाई सामन्यातूनही बाहेर काढण्यात आले.

बीसीसीआयचे दुर्लक्ष
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर संघातून अचानक गायब झाल्यानेही अनेकांना धक्का बसला होता. भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघासाठी आधार वाटत होता. त्याने 121 एकदिवसीय सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. 2021 च्या अखेरीपर्यंत त्याने अनेक एकदिवसीय सामन्यात आपला खेळ केला होता, मात्र त्याच दरम्यान त्याचा फॉर्म खराब झाला आणि बीसीसीआयने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

अधिक वाचा  काल राजीनामा दिला, आज शरद पवारांच्या भेटीला; मराठा आरक्षणावरून मागासवर्ग आयोगात मतभेद?

वर्ल्ड कप 2023 साठीची इंडियाची टीम:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग. (यष्टीरक्षक).

स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.