ठाकरे गट आणि शिंदे गट आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेत आहेत. दरम्यान एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटाला दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाला एक आठवड्यात एकमेकांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन आठवड्यानंतर या प्रकरणी सुनावणी होईल, असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी प्रतोद आणि व्हीप प्रकरणावर दिला. याप्रकरणी सुनिल प्रभु यांनी याचिका दाखल केली आहे.
ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली.
आज नेमका काय युक्तिवाद झाला?
पहिला युक्तिवाद हा सुनिल प्रभू यांनी दाखल केलेल्या व्हिप नेमका कोणाचा यावर झाला. दोन्ही गटाने युक्तिवाद केला. ठाकरे गटाकडून देवदत्त नागे तर एकनाथ शिंदे यांच्याकडून अनिल सिंह साखरे यांनी युक्तिवाद केला. अनिल सिंह साखरे यांनी आम्हांला कागदपत्रे मिळाली नाहीत असा युक्तिवाद केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला आप आपले कागदपत्रे एका आठवड्यात एकमेकांना सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर पुढील सुनावणी या प्रकरणी दोन आठवड्यात सुनावणी होईल.
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे म्हणाले, अनिल सिंघ यांनी बाजू मांडली. दोन्ही गटा एका आठवड्यात म्हणण मांडणार आहेत. लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे. दोन्ही गटाला एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.