बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गुरूवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत इतरही काही व्यक्ती होत्या आणि सुरक्षेसासाठी पोलिसही त्यांच्यासोबतत चालत होते. विशेष म्हणजे बिग बी अनवाणी पायांनी चालत मंदिरात दर्शनासाठी आले होते. पांढरा कुर्ता, पायजमा आणि शाल अशा वेषात ते मंदिरात पोहोचले.
उद्या, म्हणजेच शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याचा घूमर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिषेकच्या चित्रपटाला चांगलं यश मिळावं असं साकडं घालण्यासाठीच बिग बी हे सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले होते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबद्दलचे कारण अद्याप कोणीही स्पष्ट केलेले नाही. बऱ्याच दिवसांनंतर अमिताभ बच्चन सिद्धीविनायक मंदिरात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते दर्शनासाछी आले होते.
उद्या रिलीज होणार घूमर
अभिषेक बच्चनचा घूमर हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अभिषेक एका क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे, जो एक हात गमावलेल्या सैयामी खेरला टीम इंडियाचा भाग बनवण्यासाठी प्रशिक्षण देताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप पसंती मिळाली असून त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. आर बाल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
सुरू झाला केबीसीचा नवा सीझन
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते काही महिन्यांपूर्वी ऊंचाई चित्रपटात दिसले होते. त्यामध्ये त्यांच्यासोबत बोमन इराणी व अनुपम खेर यांचीही भूमिका होती. बिग बी यांच्या कौन बनेगा करोडपती शो च्या नव्या सीझनलाही या आठवड्यात सुरूवात झाली असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट बघत होते.