असं म्हणतात की लग्नाच्या, सहजीवनाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. हे कितीही खरं असलं तरीही हे नातं निभावण्यासाठी लागणारा प्रामाणिकपणा हे सारंकाही या नात्यात असणाऱ्या व्यक्तींनाच निभावून न्यावं लागतं. प्रेमाच्या, विवाहाच्या या नात्यामधील तेढ, समज आणि गैरसमज अशा अनेक गोष्टी आणि सोबतच काही महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांना हात घालणारी ‘मेड इन हेवन’ ही सीरिज नुकतीच Amazon Prime वरून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पहिल्या पर्वाला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर या सीरिजच्या दुसऱ्या पर्वालाही सुरुवातीपासूनच कमालीची प्रेक्षकपसंती मिळताना दिसत आहे. अशा या सीरिजमधील एक मुद्दा चाहत्यांना विशेष भावलेला दिसत आहे.

अधिक वाचा  ठाकरे गटाच्या 12 जागांवर उमेदवारांचा पराभव जिव्हारी; वचपा काढणारच; शिवसैनिकांच्या साथीने भीष्म प्रतिज्ञा

इतका, की त्यानिमित्तानं अभिनेत्री राधिका आपटेचंही तोंड भरुन कौतुक केलं जात आहे. झोया अख्तर Made In Heaven season 2 मध्ये कमालीचे संवेदनशील विषय तितक्यात हळुवारपणे हाताळण्यात आल्याचं मत चाहत्यांनी आणि सिनेजगतातील जाणकारांनीही मांडलं आहे. अभिनेत्री शोभिता धुलीपालानं साकारलेली ‘तारा’ आणि अर्जुन माथुर साकारत असणारा ‘करण’ प्रेक्षकांना विशएष भावत आहेत. शिवाय विविध लग्नसोहळे मार्गी लावण्यासाठीच्या त्यांच्या कल्पनाही तितक्याच लक्षवेधी ठरत आहेत.

The Heart Skipped a Beat
सीरिजच्या पाचव्या भागात अभिनेत्री राधिका आपटे भलतीच नजरा रोखून धरताना दिसतेय. The Heart Skipped a Beat नावाच्या या कथेसाठी राधिकानं पल्लवी मांडके या तरुणीची भूमिका साकारली आहे. एक वकील, लेखिका आणि बौद्धधर्मिय, मागासवर्गीयांच्या हक्कासाठी लढणारी सामाजिक कार्यकर्ती अशी तिची ओळख इथं सांगण्यात आली आहे. या भागामध्ये राधिका साकारत असणाऱ्या पात्राचा आंतरजातीय विवाहसोहळा दाखवण्यात आला आहे. जिथं ती तिच्या होणाऱ्या (उच्चभ्रू हिंदू जातीय तरुणाला) पतीला हिंदू विवाहपद्धतीसोबतच बौद्ध पद्धतीतील लग्नसोहळ्यासाठी तयार करते.