सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर ‘गदर 2’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनी देओलच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा सिनेमा सर्वात जलद 100 कोटींची कमाई करणाऱ्याच्या सिनेमाच्या यादीत सामील झाला आहे. या यादीत हा चित्रपट अव्वल स्थानावर आहे….

पठान (Pathaan)
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला होता.

केजीएफ 2 (KGF 2)
साऊथचा सुपरस्टार यशच्या ‘KGF 2’ या चित्रपटाला हा आकडा पार करण्यासाठी दोन दिवस लागले. या चित्रपटाची एकूण कमाई 434.70 कोटी रुपये इकते झाली होती.

अधिक वाचा  आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे-शिंदे वकिलांची जुगलबंदी, जोरदार युक्तिवाद, तरीही तारीख ठरेना

बाहुबली 2 (Baahubali 2)
या यादीत प्रभासचा हिट चित्रपट ‘बाहुबली 2’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला १०० कोटींची कमाई करण्यासाठी ३ दिवस लागले होते.

दंगल (Dangal)
आमिर खानचा ‘दंगल’ या चित्रपटाला 100 कोटींचा गल्ला जमवायला तीन दिवसांचा अवधी लागला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले.

संजू (Sanju)
संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’ने 100 कोटींचा आकडा पार करायला तीन दिवस घेतले. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता.

टाइगर जिंदा है (Tiger Zinda Hai)
सलमान खान आणि कतरिना कैफचा चित्रपट ‘टायगर जिंदा है’ ने बॉक्स ऑफिसवर 3 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटाने भारतात 339.16 कोटींची कमाई केली.

अधिक वाचा  चौंडीमधलं 21 दिवसांनंतर धनगर उपोषण मागे

बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan)
या यादीत सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचंही नाव आहे. चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार करायला तीन दिवस लागले.

वॉर (War)
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला. हा आकडा पार करण्यासाठी ‘वॉर’या सिनेमाला तीन दिवस लागले.

सुल्तान (Sultan)
या यादीत सलमान खानचा सुलतानचाही समावेश आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला होता.

गदर 2 (Gadar 2)
आता या यादीत सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर 2’ देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.