देशाचे सार्वभौमत्व चिरंतन राहण्यासाठी देशातील लोकशाही सुरक्षित असणे क्रमप्राप्त ठरते. याच लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही पुणे शहरात देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी महाअभियान हाती घेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात शुभारंभ करण्यात आला. ‘मी शरद मित्र’ नावे सुरू असणाऱ्या या महाअभियानाचा उद्घाटन सोहळा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व आमचे मार्गदर्शक मा. अंकुश आण्णा काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप व माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथे देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेसाठी उभे राहण्याचा बनू आपण सारे राष्ट्रवादी हा संकल्प करण्यात आला. आजपासून कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेले हे महाअभियान नागरिकांच्या सेवार्थ रविवार, दि. २० ऑगस्टपर्यंत कोथरूड विधानसभा मतदारसंघात विविध ९ ठिकाणी संपन्न होत आहे.

अधिक वाचा  राज्यात २८८ मतदारसंघात सर्व्हे, कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची तयारी सुरु?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस वंदन करून सुरू करण्यात आलेला हा प्रवास घरोघरी पोहोचेल, असा विश्वास वाटतो. या अभियानातून मा. पवार साहेबांनी देशासाठी गेल्या अर्ध्या शतकात दिलेले योगदान व त्यांचे अखंड कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांना एका धाग्यात बांधण्याचा आमचा उद्देश आहे.

प्रत्यक्ष जागी येऊन आपल्या नावाची नोंदणी करणे शक्य नसणाऱ्या नागरिकांच्या सेवार्थ ऑनलाईन लिंक –
https://surveyheart.com/form/64ca29e65530a26649ecd591 आम्ही ऑनलाईन सदस्य नोंदणी उपलब्ध केली असून अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती! आज उद्घाटन समारंभास जमलेला जनसमुदाय पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मा. प्रवास साहेबांचे पुरोगामी विचार घरोघरी नक्कीच पोहोचतील, यात शंकाच नाही असे मत कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक अध्यक्ष कोथरूड विधानसभा मतदारसंघ गिरीश गुरनानी यांनी नियोजन केले.