मुंबई १६ (अधिराज्य) समाजात सामाजिक चळवळ व सांस्कृतिक कला, लोककला जिवंत ठेवण्याचे महत्कार्य काम कलावंतांनी केले आहे, त्याच महत्कार्याचा संपन्न वारसा लाभलेली व कलावंतांचे माहेरघर म्हणून ओळखली जाणारी अग्रगण्य संस्था म्हणजे सम्यक कोकण कला संस्था, सदर संस्थेच्या माध्यमातून अनेक कलावंत कार्यरत आहेत; गतवर्षी संस्थेचे काही संगीतकार, कवी, गायक, वादक, लेखक काळाशी झुंज देत असता त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला यातील काही कालकथित विषेश कलावंत अमर कासारे, गणपत खैरे, गिरीधर हसोळकर, राजाराम गमरे, अशोक शिर्के यांनी कलाक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे म्हणून त्यांची कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी सम्यक कोकण कला संस्था, महाराष्ट्र (रजि.) या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवंगत कलावंतांना स्वर-श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम मा. अध्यक्ष मंदारजी कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बौध्दजन पंचायत समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हॉल, भोईवाडा, परेल, मुंबई-१२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अधिक वाचा  पुणे गणेशभक्तांना गुडन्यूज; ९२४ जादा पीएमपीची बस सेवा रात्रभर सुरू मात्र, एवढे जादाचे पैसे…

सदर प्रसंगी माजी अध्यक्ष भार्गवदास जाधव, माजी महासचिव राजाभाऊ तथा रामदास धों. गमरे यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाळ अर्पण केली त्यानंतर मंदार कवाडे, विनोद धोत्रे, मोहन थोरात, चंद्रकांत तांबे, गायिका मीनाक्षी थोरात, अनिता गायकवाड, प्रविण मोहिते, गौतम पवार, सुभाष सावंत, सतिश साळुंखे, चंद्रमणी घाडगे, नाथा जाधव यांनी दिवंगत कलावंतांच्या प्रतिमांना पुष्पमाळ अर्पण केली व कार्यक्रमाची सुरवात केली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन नरेंद्र शिंदे यांनी सादर केले तर सूत्रसंचालनाची धुरा उपाध्यक्ष विनोद धोत्रे यांनी यशस्वीरीत्या पेलवली व कार्यक्रमास रंग भरला, तद्नंतर दिवंगत कलावंतांच्या पत्नींना साड्या वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमास अनेक दिवंगत कलावंतांचे परिवार, आप्तस्वकीय, नातेवाईक आवर्जून उपस्थित होते, त्यावेळी माजी अध्यक्ष भार्गवदास जाधव, महासचिव राजाभाऊ तथा रामदास धों. गमरे, कार्याध्यक्ष भगवान साळवी, संगम कासारे, अध्यक्ष मंदार कवाडे यांनी कलावंतांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अधिक वाचा  पवार काकाच्या मदतीला पुन्हा धावला पुतण्याच; पातळी सोडणाऱ्या पडळकरांना समज द्या नाहीतर

सदर प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलावंतांनी हजेरी लावून आपल्या गीतगायनातून दिवंगत कलावंतांना स्वर-श्रद्धांजली अर्पण केली. सुनियोजित आखणी करून करण्यात आलेला कार्यक्रम शिस्तबद्ध कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल अध्यक्ष मंदार कवाडे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.