sushmita sen
आर्या- सुश्मिता सेन
ओटीटी शोने त्याच्या आकर्षक कथा आणि  प्रेक्षकांचा मूड ओळखून अनेक नवीन वेब शो ओटीटी वर रिलीज केले. प्रेक्षकांना त्यांच्या वेळेनुसार हवं ते बघता यावं उत्तम कथाचा आनंद घेता यावा या साठी अनेक वेब सिरीज सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.  गेल्या तीन वर्षात काही आकर्षक आणि तितक्याच लक्षवेधी वेब शो प्रेक्षकांनी पाहिले आणि आता लवकरच त्यांचे नवीन सीझन येणार आहेत ज्याची सगळेच आतुरतेने वाट बघतात !
फॅमिली मॅन सीझन 3:
द फॅमिली मॅनचा पहिला आणि दुसरा सीझन यशस्वीपणे चालल्या नंतर लवकरच याचा तिसरा सीझन येणार आहे. अभिनेता मनोज बाजपेयी हे श्रीकांत तिवारी म्हणून घराघरात प्रसिद्ध  झाले जो एक मध्यमवर्गीय माणूस आहे जो गुप्तपणे थ्रेट अॅनालिसिस अँड सर्व्हिलन्स सेल (TASC) साठी गुप्तचर अधिकारी म्हणून काम करतो. समंथा रुथ प्रभू हिने प्रतिपक्षाची भूमिका साकारल्याने दुसरा सीझन देखील तितकाच उत्साह वर्धक ठरला. आता चाहते तिसरा सीझन प्रसारित होण्याची आणि बाजपेयी पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये पाहण्याची प्रेक्षक वाट बघतात.
mirzapur
मेड इन हेवन सीझन 2:
तारा आणि करण, दिल्लीतील दोन वेडिंग प्लॅनर, ‘मेड इन हेवन’ या कंपनीचे मालक आहेत. या मालिकेने प्रेक्षकाची मन तर जिंकली आणि प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं.आता प्रेक्षक तारा आणि करणच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
मिर्झापूर सीझन 3:
मिर्झापूरचा पहिला सिझन झटपट हिट झाला. इंडस्ट्रीतील काही सर्वोत्कृष्ट कलाकारांची कलाकृती यातून सगळ्यांनी अनुभवली. या क्राईम अ‍ॅक्शन थ्रिलरने हा वेब शो सुपरहिट ठरला. आता तिसरा सीझन मध्ये काय पाहायला मिळणार या साठी सगळेच वाट बघतात.
आर्या सीझन 3:
सुष्मिता सेन सारख्या शक्तिशाली अभिनेत्रीने या प्रकल्पाचे नेतृत्व केल्याने, एखाद्याला माहित होते की आर्या कमालीची वेब सीरिज असणार आहे. सेनला शहरातील नवीन लेडी-डॉन म्हणून ओळखल जातंय आणि आता प्रेक्षक तिसरा सीझन येण्याची आतुरतेने वाट बघतात.
दुरंगा सीझन 2:
दुरंगाचा सीझन 1 इतका लोकप्रिय ठरल्यानंतर लवकरच या वेब  शो चा नवीन  सीझन येणार आहे. गुलशन देवैया आणि दृष्टी धामी यांच्या मोहक कामगिरीसह, अभिनेता अमित साधने ‘दुरंगा’ सीझन 1 मध्ये एक कमालीचा कॅमिओ केला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून आणि निर्मात्यांकडून खूप प्रेम मिळालं. आता अमित दुरंगा सीझन 2 मध्ये एक मनोरंजक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाल्याचं समजतंय. या सीझनमध्ये त्याचे पात्र कसं असणार आहे या साठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
वेब विश्वासाठी 2023 हे वर्ष नक्कीच उत्कंठावर्धक दिसत आहे. यापैकी कोणत्या मालिकेबद्दल तुम्ही जास्त उत्सुक आहात हे जाणून घ्यायचं !
अधिक वाचा  पुण्यात 18 पालकांवर गुन्हा दाखल, शिक्षण विभागाची कारवाई; जाणून घ्या नेमकं घडलंय काय