जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीविरोधात ग्रामस्थांनी आपला रोष विविध मार्गांनी व्यक्त केला. सध्या जेजुरीत ग्रामस्थांचे चक्री उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ५ जून) या विश्वस्त निवडीचा पुनर्विचार करण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.

जेजुरी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तमंडळाची निवड सहधर्मदाय आयुक्तांनी केली आहे. त्यात पाचजणांचा जेजुरीबाहेरील विश्वस्तांचा समावेश आहे. दरम्यान, विश्वस्तपदासाठी तब्बल ३५० हून अधिक ग्रामस्थांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यातील फक्त एकाच ग्रामस्थाची विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जेजुरीकरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्वस्तपदांसाठी निवड करताना सहधर्मदाय आयुक्तांनी कोणत्या निकषांचा विचार केला, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचा  ‘सज्जन आता जगणारच नाही…’ तुकोबांबरोबर एकनाथ ही दूर सारायचा प्लॅन तयार…; जयंत पाटलांनी नेहमीच्या शैलीत महायुतीवर डागले बाण

जेजुरीबाहेरील जास्त विश्वस्तांच्या निवडीचा जेजुरीकरांनी निषेध केला. या विश्वस्तमंडळाला सहकार्य न करण्याचा ठराव यापूर्वीच करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी पुणे-पंढरपूर मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आता जेजुरीत चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. या निवडीविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारीही आंदोलकांनी केली आहे. आता या विश्वस्तांच्या निवडीचा पुनर्विचार करवा अशी याचिका आंदोलकांच्या वतीने सहधर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

याबाबत जेजुरी आंदोलकांचे कायदेशीर सल्लागार अॅड. अशोक भोसले यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना माहिती दिली. अॅड. भोसले म्हणाले, “जेजुरी देवस्थानच्या ट्रस्टवर निवडलेल्या बाहेरील विश्वस्ताबाबत जेजुरीतील ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या निवडीबाबत पुनर्विचार करण्याबाबत सोमवारी सहधर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेवर येत्या दोन दिवसात सुनावणी होणार आहे.”

अधिक वाचा  अजितदादांचं Dream बजेट पाहिलं का? 5 वी घोषणा समजून घ्या या अर्थसंकल्पातील 7 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे…