आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने पुण्यात भाकरी फिरवण्यास सुरूवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पुण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी नियुक्ती देण्यात आलेले राजेश पांडे यांना आता पुणे ग्रामीण आणि मावळचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने पुणे जिल्ह्यासाठी भाकरी फिरवण्यास सुरूवात केली आहे. तसेच भाजपकडून आता नवीन २ विभाग करण्यात येणार आहे. त्यात उत्तर पुणे जिल्हा आणि दक्षिण पुणे जिल्हा असे विभाग करण्यात येणार आहेत. त्यासाठी २ जिल्ह्यध्यक्ष देखील निवडले जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानुसार पुणे शहर प्रभारी म्हणून अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड शहाराच्या प्रभारी म्हणून वर्षा डहाळे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे गुरूवारी वाटप केले.
यामध्ये
पूणे अमर साबळे, सातारा स्मिता वाघ,
धुळे शहर व ग्रामीण, जयप्रकाश ठाकुर
ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर, ठाणे शहर संजय भेंडे,
भंडारा वर्धा, अतुल कोळसेकर,
नवी मुंबई, उत्तर व दक्षिण रायगड, धर्मपाल मेश्राम
चंद्रपुर शहर व गोंदिया, गजानन घुगे
नांदेड शहर व ग्रामीण, परभणी शहर व ग्रामीण, विक्रम पावसकर
कोल्हापुर हातकणंगले, कोल्हापुर, पश्चिम डॉ. अजित गोपचडे
बीड, धाराशिव, हाजी हजाज देशमुख
जालना, राजेंद्र गावित
नाशिक शहर व उत्तर नाशिक, दक्षिण नाशिक याशिवाय प्रदेश सचिवांनाही जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे