भाजप केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 30 मे 2019 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी सरकारला आता 26 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपने देशभर 30 मे ते 30 जून या कालावधीत देशात तब्बल 50 रॅली काढण्याचं नियोजन केल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये जेपी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे बडे नेते सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही लागल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन तर्फे बावधनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

राजस्थानमधील अजमेर येथे 31 मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबरोबरच 27 मे रोजी जे.पी. नड्डा हे मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामांबाबत सांगणार आहेत, अशी माहिती सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामांचा प्रचार करण्याचा हा मास्टर प्लॅन तयार केला असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मोदी सरकारने नऊ वर्षात केलेली कामे या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवली जाणार आहे.