पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच अविनाश भोसलेंच्या याचिकेवरील सुनावणी ६ जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. अविनाश भोसले हे जवळपास एक वर्षापासून कोठडीत आहेत. २६ मे रोजी त्यांनी पहिल्यांदा सीबीआयने अटक केली होती, यस बँक आणि डिएचएफएल घोटळा प्रकरणात त्यांना सीबीआयने अटक केली होती. काही अनियमीत कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. ईडीने मनी लाँड्रींगच्या आरोपात देखील तपास सुरू केला होता. तेव्हापासून अविनाश भोसले हे कैदेत आहेत.

अधिक वाचा  पुण्यात सततच्या पावसामुळे पाणी साचले, वाहतूक कोलमडली; शहर ठप्प

अविनाश भोसलेना जवळपास वर्षभरापासून जामीन मिळालेला नाहीये. याचप्रकरणी दिलासा मागत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान जून पर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केल्याने अविनाश भोसलेंना कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये.