मोबाईल, इंटरनेटच्या जगात गुरफटलेल्या आजच्या मुलांना आपली संस्कृती व पारंपरिक खेळ एकतर माहीत नाही किंवा धावपळीत गुंतलेल्या थोरामोठ्यांनाही त्यांना हे सांगायला वेळ नाही. बाहुला-बाहुलीचे लग्न हा एकेकाळी लहान मुलांचा खास आवडीचा कार्यक्रम. उन्हाळ्याच्या सुट्यात आपल्या संवगड्यांसह अनेक जन मोठ्या उत्साहात ते पार करीत आणि मोठ्यांनाही या आनंदात सहभागी करून घेत. परंतु आजच्याही काळात ही पंरपंरा चालु ठेवली आहे ती पुण्यातील कोथरूड येथील विश्वेश्वर/पोस्टमन कॅालनी मधील रहिवाश्यांनी. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत या भातुकलीचा खेळामधील बाहुला – बाहुलीचं लग्नाचे आयोजन येथील रहिवाशी आपल्या बालकांसाठी करत असतात. कुतुहल व उत्सुकतेपोटी या सोहळ्या मध्ये परिसरातील अनेक जन मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
दोन दिवसांपुर्वी नवरा नवरीची उटण्याचा कार्यक्रम पार पडला. हळदी नंतर लुटुपुटीच्या या लग्नात ठरलेल्या मुहूर्तावर सजलेले वर-वधू तयार झाले. बच्चे कंपनी आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ मंडळीही आकर्षक पारंपरिक वस्त्र परिधान करून लग्नात सहभागी झाले. बालजगतच्या परिसरातून थाटात बाहुल्या वराची वरात काढण्यात आली. तिकडे वधू झालेली बाहुलीही नवरीच्या वस्त्रात तयार होऊन वाट पाहत होती. एकीकडे रुखवत सजला होता लग्नाची झाल तयार झाली होती त्यातच वरात मांडवात पोहचली तसे वर-वधूला समोरासमोर येवुन मंगलाष्टक म्हणून लग्नाचा धुमधडाका वाजविला आणि व~र्हाड्यांनीही आपल्या हातातील अक्षता वधू-वरावर टाकल्या. त्यांनतर व~र्हाड्या मंडळींनी व लहानग्यांनी रुखवता मधील पदार्थ व भेळ वर ताव मारला. भातुकलीच्या खेळा मध्ये बालकांच्या उत्साहाबरोबर थोरामोठ्यांनीही आनंद लुटला.
हा सोहळा पार पाडण्यासाठी सौ. प्रमिला राऊत, सौ. वाळुंजकर, सौ. मारणे, सौ.जोरी, सौ. जाधव, सौ.बधे, सौ. यादव, सौ. दिघे, सौ.साठे, सौ. चव्हाण, सौ.गाडे, सौ. आमले, सौ.जंगम, सौ.गायकवाड, सौ.देशमुख, सौ.लोंढे, सौ. सातपुते आदि प्रयत्न करीत असतात. गेल्या ७ वर्षापासून बाहुला बाहुली लग्न सोहळ्याचे येथील रहिवाशी आयोजन करीत असल्याची माहिती श्री समीर जोरी यांनी दिली.