अनेकदा घरातील कचरा घंटा गाडीत न टाकता तो रस्त्याच्या आजूबाजूला उघड्यावर फेकला जातो. मात्र आता अशा घटनांना चाप बसणार आहे. यासाठी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आणि वारुळवाडी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला आहे. कचरा उघड्यावर फेकणाऱ्या नागरिकांवर आता या दोन ग्रामपंचायतींची करडी नजर असणार आहे. यासाठी या ग्रामपंचायतींकडून एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला आणि मीना नदीत कचरा फेकणाऱ्यांचे फोटो किंवा व्हिडीओ ग्रामपंचायतीला द्या आणि एक हजार रुपये बक्षिस मिळवा अशी ही योजना आहे.

पाच हजारांचा दंड

कचरा फेकणाऱ्यांचे हे फोटो ग्रामपंचायतीच्या वतीनं चौकातील फ्लेक्सवर लावण्यात येणार आहेत. एवढचं नव्हे तर अशा नागरिकांकडून तब्बल पाच हजारांचा दंड करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या या अभिनव उपक्रमामुळे बाहेर उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आळा बसणार आहे. एवढचं नाही तर परिसर स्वच्छ राहण्यास देखील मदत होणार आहे.

अधिक वाचा  शेती म्हणजे व्यवसाय! Go Farmly च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवसंजीवनी