नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी युनिफॉर्म तयार करणार असे म्हणाले होते. त्यानतंर त्यांनी देशातील संरक्षण विभागाचेच खासगीकरण केले. चीनने आपल्या देशावर कब्जा केला, मात्र देशातील ५६ इंचची छातीचे नेतृत्व यावर बोलताना दिसत नाहीत. मी पंतप्रधान मोदी यांच्यासारखा खोटारडा माणूस नाही.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही पटोले यांनी यावेळी समाचार घेतला. नाना पटोले म्हणाले, “सध्या जगाच्या पाठीवर दिसणारे भारतातील कॉम्पुटर इंजिनियर ही राजीव गांधी यांची देण आहे. आताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर एका काळ्या टोपीवाल्याला बसवले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले यांचा वारंवार अपमान केला.”

अधिक वाचा  टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू पोहोचला इंग्लंडला, खेळणार ४ सामने

केंद्रातील सरकार बनिया वृत्तीचे असल्याची टीकाही पटोले यांनी केली. ते म्हणाले, “सध्या देशभरात कृत्रिम महागाई सुरू आहे. लोकांना गरीब करून गुलाम करण्यासाठी ही भाजपची नीती आहे. केंद्रातील भाजप सरकार हे बनिया वृत्तीचे आहे.” यानंतर त्यांनी नाव न घेताल औरंगाबाचे खासदार इम्तियाज जलिल यांचाही समाचार घेतला.