मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात झाली. सलामीचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. त्यानंतर तिथपासून ते आतापर्यंत म्हणजे 21 मे पर्यंत या 52 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आणि 70 सामन्यानंतर अखेर प्लेऑफसाठीचे 4 संघ ठरले आहेत. विशेष बाब म्हणजे साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर प्लेऑफसाठी चौथा संघ मिळाला. यावरुन या मोसमातील साखळी फेरीत किती थरार रंगला, याचा अंदाज बांधता येतो.

गुजरात टायटन्स टीमने या हंगामात 15 मे रोजी सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत प्लेऑफमध्ये धडक मारली. गुजरात सलग दुसऱ्यांदा 2022 आणि 2023 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. त्यानंतर 20 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर मात केली. चेन्नई अशाप्रकारे प्लेऑफला पोहचणारी दुसरी टीम ठरली.

या डबल हेडरमधील दुसरा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. लखनऊने या थरारक सामन्यात 1 धावेने विजय मिळवत प्लेऑफसाठी एन्ट्री मिळवली. लखनऊ प्लेऑफसाठी पात्र ठरणारी तिसरी टीम ठरली. त्यामुळे 4 पैकी 3 टीम निश्चित झाल्या.

आता जागा 1 आणि प्रबळ दावेदार 2, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स. रविवारी 21 मे रोजी या 16 व्या मोसमातील शेवटचं डबल हेडर खेळवण्यात आलं. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांना विजय गरजेचा होता. मुंबईने या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर कॅमरुन ग्रीन याच्या शतकाच्या जोरावर विजय मिळवला. मुंबईने या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या.

अधिक वाचा  पिंपरी-चिंचवडमध्ये ६ बेकायदेशीर शाळा उघडकीस – पालकांना प्रवेश न घेण्याचा इशारा

मुंबईच्या विजयामुळे आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत जिंकावं लागणार होतं. या 21 मे रोजीच्या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने होते. आरसीबीने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर जीटीला 198 धावांचं आव्हान दिलं. मात्र जीटीने शुबमन गिल याच्या झुंजार शतकाच्या जोरावर ते आव्हान पूर्ण केलं. जीटीच्या या विजयाने मुंबईला लॉटरी लागली आणि पलटण प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. तर आरसीबीचं आव्हान साखळी फेरीतच संपलं.

अशा प्रकारे आयपीएल 2023 ला प्लेऑफसाठी 4 टीम मिळाल्या. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांमध्ये आता आयपीएल चॅम्पियन होण्यासाठी लढत पाहायला मिळणार आहे.

गुजरात आणि चेन्नई या टॉप 2 मध्ये असल्याने या दोघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळणार आहेत. तर लखनऊ आणि मुंबई तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. यामुळे या दोन्ही संघांना फायनलपर्यंत पोहचण्यासाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत.

आता या निमित्ताने आपण आयपीएल 2023 प्लेऑफमधील सामन्याचं वेळापत्रक जाणून घेणार आहोत. प्लेऑफमधील सामन्यांना मंगळवार 22 मे पासून सुरुवात होणार आहे. क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असं या प्लेऑफचं स्वरुप असणार आहे.

प्लेऑफ क्वालिफायर 1 मॅच ही गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या पैकी जिंकणारी टीम थेट फायनलला पोहचेल. तर पराभूत टीम क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर जिंकून येणाऱ्या टीम विरुद्ध भिडेल.

अधिक वाचा  शिवसेना ठाकरे गटात मोठी हालचाल! सर्व आमदार, खासदारांना महत्त्वाचे निर्देश आगामी निवडणुकीबाबत चर्चा होणार का?

त्याआधी एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. एलिमिनेटर सामना जिंकणारी टीम क्वालिफायर 2 सामना खेळेल. या सामन्यात क्वालिफाय 1 मध्ये पराभूत झालेली टीम एलिमिनेटरमध्ये जिंकलेल्या संघाविरुद्ध खेळेल. तर त्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये जिंकणारी टीम थेट अंतिम सामन्यात पोहचेल. हा अंतिम सामना 28 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

पहिल्या 2 संघाना फायनलसाठी 2 संधी

पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 2 स्पॉटवर असलेल्या संघांना प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे बहुतांश संघांचा हा पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 2 क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न असतो. या प्रयत्नात गुजरात आणि चेन्नईने यश मिळवलं आहे. त्यामुळे गुजरात आणि चेन्नईला 2 संधी मिळणार आहे.

आयपीएल प्लेऑफ 2023 वेळापत्रक

मंगळवार 23 मे 2023 क्वालिफायर 1

गुजरात टायटन्स v चेन्नई सुपर किंग्स

एम ए चिदंबरम स्टेडियम संध्याकाळी साडे सात वाजता

बुधवार 24 मे 2023

लखनऊ सुपर जायंट्स v मुंबई इंडियन्स

एम ए चिदंबरम स्टेडियम संध्याकाळी साडे सात वाजता

शुक्रवार 26 मे 2023 क्वालिफायर 2

नरेंद्र मोदी स्टेडियम संध्याकाळी साडे सात वाजता

रविवार 28 मे 2023 फायनल (Final)

नरेंद्र मोदी स्टेडियम संध्याकाळी साडे सात वाजता

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

अधिक वाचा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रीकरण पूर्णविराम? शरद पवारांच्या भूमिकेवर अजितदादांचीही पहिली प्रतिक्रिया…

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन

बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.