नवी दिल्ली : आयपीएल स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा दणदणीत पराभव केला. धर्मशाला येथे पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने राजस्थानला 188 धावांचं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट राजस्थानने शेवटच्या षटकात पार पाडलं. राजस्थान रॉयल्सच्या विजयामुळे पंजाबचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पंजाबच्या पराभवामुळे प्लेऑफचं गणितही बिघडून गेलं आहे.

पंजाब किंग्सपूर्वी सनराईजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा मावळली होती. अजूनही आयपीएलमध्ये चार सामने व्हायचे बाकी आहेत. आतापर्यंत गुजरा टायटन्सने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर इतर सहा संघ अजूनही प्लेऑफच्या स्पर्धेत आहेत.

चेन्नई सुपर किंग्स : चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या मोसमातील 13 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई सध्या 15 पॉइंट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी धोनी ब्रिगेडच्या या संघाला आज दिल्ली कॅपिटल्सला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागणार आहे. आजचा सामना गमावल्यास मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पैकी कोणता तरी एक संघ पराभूत व्हावा म्हणून चेन्नईला देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. किंवा कोलकाताने लखनऊ संघाला मोठ्या फरकाने हरवल्यास चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग मोकळा होणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स : कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपला शेवटचा सामना जिंकावा लागेल. लखनऊच्या संघाचा शेवटचा सामना आजच आहे. त्यांची भिडत कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. आजचा सामना गमवावा लागल्यास मुंबई इंडियन्स किंवा आरसीबी पराभूत व्हावेत म्हणून लखनऊला देव पाण्यात ठेवावे लागतील. कारण या दोन्ही संघापैकी एक संघ पराभूत झाल्यास लखनऊला प्लेऑफचे दरवाजे उघडतील.

अधिक वाचा  परवानगीशिवाय शाळा चालवली; ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलविरोधात पालक आक्रमक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : आरसीबीलाही प्लेऑफमध्ये जाण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. उद्या रविवारी 21 मे रोजी आरसीबीची लढत गुजरातशी आहे. उद्याचा सामना आरसीबी हारल्यास त्यांना मुंबई, लखनऊ किंवा चेन्नई या तीन संघापैकी एखादा संघ पराभूत होण्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, उद्या गुजरातविरोधात पराभूत होतानाही मोठ्या फरकाने पराभव होणार नाही याची काळजी आरसीबीला घ्यावी लागणार आहे. नाही तर रन रेटमध्ये आरसीबीचा प्लेऑफचा दावा संपुष्टात येईल. कारण आरसीबीपेक्षा राजस्थानचा रन रेट चांगला आहे.

राजस्थान रॉयल्स : राजस्थान रॉयल्स अंकतालिकेत पाचव्या स्थानी आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये जाईल अशी कोणतीच शक्यता नाही. केवळ नशीब बलवत्तर असेल तरच राजस्थानला प्लेऑफमध्ये संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि आरीसीबीने आपले शेवटचे सामने गमावले, कोलकाता संघ लखनऊकडून पराभूत झाल्यास आणि कोलकाता आणि लखनऊच्या विजयातील अंतर 103 धावांचं असल्यावरच राजस्थानला प्लेऑफमध्ये संधी मिळेल.

मुंबई इंडियन्स : मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. त्याशिवाय आरसीबी, सीएसके किंवा लखनऊ या पैकी एखादा संघ पराभूत होण्याची प्रार्थानाही करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्स आपला शेवटचा सामना हारल्यास मुंबईचा प्लेऑफचा दावा संपुष्टात येणार आहे.

अधिक वाचा  वाघोलीजवळ बालसंगोपन केंद्रात ५५ वर्षीय शिपायाकडून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; महिन्याभर सुरू होते शोषण

कोलकाता नाइट रायडर्स : कोलकाता नाइट रायडर्सला लखनऊला कमीत कमी 103 धावांनी पराभूत करावं लागणार आहे. तसेच मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागणार आहे. तसं झालं नाही तर कोलकाताला प्लेऑफमधून बाहेर पडावे लागणार आहे.

कुणाचा कुणासोबत मुकाबला?
20 मे- 15.30- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
20 मे- 19.30- कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता
21 मे- 15.30- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, मुंबई
21 मे- 19.30- रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू विरफडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर नागपूरात रीघ?; ही संभाव्य मंत्र्यांची यादी! कुल, गोरेही दाखल

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या 23 किंवा 24 मे रोजी मंत्रिमंडळांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल सायंकाळी दिल्लीमध्ये गेले होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ते पुन्हा मध्यरात्री राज्यात परतले आहेत. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आल्याची माहिती मिळत आहे. राज्याच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांचा दिल्ली दौरा होता, अशी खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र फडणवीस दिल्लीला गेले होते, ही माहिती नागपूरच्या भाजप कार्यालयाकडून नाकारण्यात येते. फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर आता त्यांच्या निवासस्थानी आमदारांची गाठीभेटी होत आहेत. काही आमदार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या हालचाली सरकारमध्ये सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

अधिक वाचा  टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू पोहोचला इंग्लंडला, खेळणार ४ सामने

काहींना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. ज्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशा आमदारांची नाव पुढे आली आहेत.

ज्यामध्ये….
1) भरत गोगवले ( जलसंधारण),
2) संजय शिरसाट (परिवहन / सामाजीक न्याय मंत्री)
3) प्रताप सरनाईक( गृहनिर्माण मंत्रालय )
4) बच्चू कडू (दिव्यांग विकास मंत्री)
5) सदा सरवणकर,
6) यामिनी जाधव
7) अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.

कालच दि. १९ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि काटोलचा दौरा केलेला होता. दिवसभर त्यांनी प्रशाकीय आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यालाही त्यांनी संबोधित केलं. संध्याकाळच्या सुमारास ते नागपूरातून निघाले होते. सूत्रांकडून जी काही माहिती मिळत आहे, त्यानुसार फडणवीस हे अवघ्या काही तासांसाठी नवी दिल्लीला जाऊन आले. पुन्हा मध्यरात्री ते नागपूरला परतले. मात्र याबाबतची त्यांच्या नागपूर कार्यालयाकडून याची माहिती नाकारली जात आहे. मात्र यानंतर आमदारांच्या गाठीभेटी वाढल्याने, फडणवीस यांची दिल्लीवारी एकप्रकारे दुजारा मिळत आहे.