मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या 23 किंवा 24 मे रोजी मंत्रिमंडळांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल सायंकाळी दिल्लीमध्ये गेले होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ते पुन्हा मध्यरात्री राज्यात परतले आहेत. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आल्याची माहिती मिळत आहे. राज्याच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांचा दिल्ली दौरा होता, अशी खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र फडणवीस दिल्लीला गेले होते, ही माहिती नागपूरच्या भाजप कार्यालयाकडून नाकारण्यात येते. फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर आता त्यांच्या निवासस्थानी आमदारांची गाठीभेटी होत आहेत. काही आमदार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या हालचाली सरकारमध्ये सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

अधिक वाचा  ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

काहींना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. ज्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशा आमदारांची नाव पुढे आली आहेत.

ज्यामध्ये….
1) भरत गोगवले ( जलसंधारण),
2) संजय शिरसाट (परिवहन / सामाजीक न्याय मंत्री)
3) प्रताप सरनाईक( गृहनिर्माण मंत्रालय )
4) बच्चू कडू (दिव्यांग विकास मंत्री)
5) सदा सरवणकर,
6) यामिनी जाधव
7) अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.

कालच दि. १९ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि काटोलचा दौरा केलेला होता. दिवसभर त्यांनी प्रशाकीय आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यालाही त्यांनी संबोधित केलं. संध्याकाळच्या सुमारास ते नागपूरातून निघाले होते. सूत्रांकडून जी काही माहिती मिळत आहे, त्यानुसार फडणवीस हे अवघ्या काही तासांसाठी नवी दिल्लीला जाऊन आले. पुन्हा मध्यरात्री ते नागपूरला परतले. मात्र याबाबतची त्यांच्या नागपूर कार्यालयाकडून याची माहिती नाकारली जात आहे. मात्र यानंतर आमदारांच्या गाठीभेटी वाढल्याने, फडणवीस यांची दिल्लीवारी एकप्रकारे दुजारा मिळत आहे.

अधिक वाचा  भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे कार्यालय १३ वर्ष ‘वीजचोरी’ महावितरणकडूनच कलम १३५ चा भंग; ॲड. असीम सरोदेंची नोटिस