पुण्यातील येरवडा कारागृहासंबंधी एक मोठी आणि महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैदी लवकरच त्यांच्या घरच्यांना साधा वा व्हिडीओ कॉलही करू शकतील. कारागृहातील कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून लवकरच या उपक्रमाला सुरूवात होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कैद्यांना भेटण्यासाठी राज्यातील सगळ्यात कारागृहांमध्ये नाते व त्यांची मोठी गर्दी होत असते. तसेच कैद्यांना त्यांच्या बराखीतून कॉइन बॉक्स पर्यंत न्यावे लागते ते सुरक्षेच्या दृष्टीने जोखमीचे ही ठरू शकते. त्यामुळे मोबाईल फोन द्वारे संभाव्य धोका कळू शकतो, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  पुणे-सातारा महामार्गावरील कामे रखडली; पावसाळ्यात प्रवाशांचे हाल कायम

या उपक्रमाची लवकरच येरवडा कारागृहातून सुरूवात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर याला सुरुवात करण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्वच कारागृहात ही सुविधा दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कैद्यांना दिले जाणारे मोबाइल सेट हे कारागृह प्रशासनाच्या ताब्यात असतील व केवळ कॉलसाठी ते त्यांच्याकडे दिले जाणार आहेत. सध्या येरवडा कारागृहातील कैद्यांना फक्त आठवड्यातून १० मिनिटे कुटूंबियांशी बोलण्याची परवानगी आहे. मात्र त्यांना एकमेकांना पाहता येत नाही. याच गोष्टीचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे..