मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासून उमेदवार चाचपणी सुरु झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा तिकिट वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यंदा निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच तिकीट देण्यात येणार आहे, त्यासाठी भाजपने पालिका प्रभागनिहाय जागांचा सर्व्हे केला आहे.
आतापर्यंत 4 जागांचा सर्व्हे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर यावेळी भाजप कमकुवत उमेदवारांना डच्चू देणार आहे, तर विरोधीपक्षातील सक्षम उमेदवारांवरही भाजपचा डोळा असणार आहे. उमेदवारांच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी भाजपकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
पालिका निवडणुकीसाठी भाजप गुजरात पॅटर्न राबवणार असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे भाजप पालिकेसाठी कोणाला तिकीट देते आणि कोणाचे तिकिट कापणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.