मुंबई : आरसीबी आणि हैदराबाद यांच्यामधील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 विकेट्स आणि चार चेंडू राखून विजय मिळवला आहे. विराट कोहलीने केलेली 100 धावांची शतकी खेळी आणि फाफ डू प्लेसिसच्या 72 धावांच्या अर्धशतकी खेळीने संघाने हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा सहजपणे पाठलाग केला. या विजयासह आता पॉइंट टेबलमध्ये मोठा फरक पाहायला मिळणार आहे.
संघ मॅच गुण एनआरआर
गुजरात टायटन्स 13 18 +0.835
चेन्नई सुपर किंग्स 13 15 +0.381
लखनऊ जायंट्स 13 15 +0.304
आरसीबी 13 14 +0.180
मुंबई इंडियन्स 13 14 -0.128
राजस्थान रॉयल्स 13 12 +0.140
या विजयासह आरसीबी संघाने पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. आता आरसीबीचे आणि मुंबईचे 14 झाले आहेत. इथून पूढे सर्वच संघाच एक सामना राहिला आहे मात्र चेन्नई, लखनऊ, आरसीबी, मुंबई आणि राजस्थान या संघांना हे सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचं या संघांना फक्त विजयच मिळवून चालणार नाही. कारण सर्वांसाठी नेट रनरेट एक्स फॅक्टर ठरणार आहे.
या सर्व संघांच्या रन रनरेटनर नजर मारली तर लक्षात येईल की फक्त मुंबई संघाचा रनरेट हा मायनसमध्ये आहे. कारण चेन्नई, लखनऊ, आरसीबी आणि राजस्थान यांचे रनरेट प्लसमध्ये आहेत. त्यामुळे आता सर्वांसाठी जर तरच गणित असणार आहे. मुंबईचा शेवटचा सामना हैदराबादसोबत असून त्यांना त्यामध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
आजच्या सामन्यात हे घडलं
सनराइजर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 187 धावांचं लक्ष्य आरसीबीला दिलं होतं. यामध्ये हेनरिक क्लासेन याने 104 धावांची सर्वाधिक शतकी खेळी केली. आरसीबीकडून ब्रेसवेलने सर्वाधिक 2 तर सिराज, शाहबाज आणि हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आरसीबीकडून लक्ष्य़ाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी 172 धावांची सलामी दिली. यामध्ये विराट कोहलीने 100 धावा तर फाफ ने 72 धावा केल्या. त्यानंतर मॅक्सवेल आणि ब्रेसवेल यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.