लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे. 2019च ्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती हे दोन बालेकिल्ले ढासळले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही बालेकिल्ले पुन्ह सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. इतकंच नव्हे तर अमरावतीसाठी सुषमा अंधारेंचं नाव निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर मागील 3 दशकांपासून शिवसेनेचं वर्चस्व होतं. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी पराभव केला.

जलील यांना मिळालेली वंचित बहुजन आघाडीची साथ आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली तब्बल पावणेतीन लाख मतं यांमुळे चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक पराभव झाला होता. त्या निवडणुकीत तर काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. पण आता छत्रपती संभाजीनगरच बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट सज्ज झालाय. मात्र 2024च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देणार की अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार? यावरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  अवकाळीनं राज्याला झोडपलं, कुठे-कुठे पाऊस? पुणे जिल्ह्याला देखील येथे बसला मोठा फटका वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच अमरावती लोकसभा मतदारसंघही शिवसेनेचा बालेकिल्ला होता. 1996 ते 2019 पर्यंत 1998चा अपवाद वगळता शिवसेनेनंच अमरावतील लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. आता विद्यमान खासदान नवनीत राणा यांना त्यांच्या मतदारसंघात गुंतवून ठेवण्याची खेळी ठाकरे गटानं केलीय. ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंना अमरावतीतून मैदानात उतरवण्याची रणनिती असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीतला पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला होता.

2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत युती असूनही शिवसेनेनं बालेकिल्ले गमावले होते. आता शिवसेना आणि ठाकरे गट वेगळे झाले आहेत. अशा वेळी महाविकास आघाडीच्या सोबतीनं ठाकरे गट बालेकिल्ले पुन्हा ताब्यात घेऊ शकेल का? हा प्रश्न निर्माण झालाय.

अधिक वाचा  पुणे कोथरूडमधील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या; विमानतळावर अपरहण मृतदेह राष्ट्रीय महामार्ग- ३३ वर फेकून फरार