छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाचं हे ३५० व वर्ष आहे. महाराजांनी माँ जिजाऊंच्या सांगण्यावरून राज्यभिषेक केला होता. महाराजांचे पराक्रम लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आम्ही वर्षभरात १०० विविध कार्यक्रम घेणार आहोत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आम्ही २ जून रोजी कार्यक्रम घेणार आहोत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यक्रमात असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे. वर्षभरात एका कार्यक्रमाला मोदींनी यावं असं नियोजन सुरू असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार व वाघ नख आणण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. लवकरचं लंडनला आमचा एमओयू होईल ही तलवार यावर्षी भारतात येईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. शिवराज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापन सोहळा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते.

अधिक वाचा  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?