मुबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमेदवारच बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याऐवजी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाला पसंती असल्याचं सांगण्यात येतं आहे. तर अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून, भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात उतरण्यात येणार आहे.
याशिवाय दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.