‘ते’ एक वाक्य

सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणालेत. डी के शिवकुमार यांच्या या वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं बोललं जातंय. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यांच्या निर्णयाकडे काँग्रेस नेत्यांसह कर्नाटकच्या जनतेचं लक्ष लागलंय.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून खर्गे अंतिम निर्णय घेणार आहेत. कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत बंगळुरूमध्ये घोषणा होऊ शकते, अशी माहिती आहे.

अधिक वाचा  हवामान विभागाची शुभवार्ता! दणकून ‘कोसळ’धार अवघा महाराष्ट्र चिंब होणार मॉन्सून पहिल्या टप्प्याचा अंदाज जाहीर

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर आणखी एका आमदाराचा दावा

दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर आणखी एका आमदाराने दावा केला आहे. काँग्रेसचे नेते जी परमेश्वर यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. माझ्यासोबत 50 आमदार आहेत. पण पदासाठी पुढे पुढे करणं मला जमत नाही. पण सध्या मी शांत आहे. पण याचाच अर्थ मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असा होत नाही. मनात आणलं तर मी काहीही करू शकतो. असं जी परमेश्वर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींना निर्णय घेण्यात अडचणी होऊ शकते.

कर्नाटकचा निकाल

कर्नाटकात 22 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता आली आहे. 224 पैकी 137 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर भाजपकडे 65 जागा आहेत. 19 जागांवर जेडीएसला यश मिळालंय. तर अपक्ष आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत.

अधिक वाचा  चेन्नईला विजयामुळे ‘इम्पॅक्ट’ ऑक्सिजन; महेंद्रसिंह धोनी आणि शिवम दुबे जोडीने विजयश्री खेचून आणला