आज लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागेवर लढायचे आणि कोणत्या जागेवर पाठिंबा द्यायचा याबाबत रणनिती ठरवण्यात आली आहे. दरम्यान तालुका आणि जिल्हा अध्यक्ष देखील बदलण्यात येणार असून जे सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले आहेत, त्यांना बढती देण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

राष्ट्रवादीच्या या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपसमोर एक मजबूत पर्याय यामुळे निर्माण होणार आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष आहे, त्या मतदारसंघांची जबाबदारी पक्षाच्या वतीनं नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

अधिक वाचा  पोलिसांकडून मनसे नेते पहाटे 3 वाजता घरातून उचलले; पदाधिकाऱ्यांची मध्यरात्री धरपकड यांना दिल्या नोटिसा?

विभागानुसार नेत्यांवर जबाबदारी

नागपूर विभाग
राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अमरावती विभाग
राजेंद्र शिंगणे
नाशिक नगरसह मराठवाडा विभाग
धनंजय मुंडे
कोल्हापूर, सातारा, सांगली
शशिकांत शिंदे
पुणे विभाग
सुनील शेळके
कोल्हापूर
अशोक पवार
खानदेश
एकनाथ खडसे आणि अनिल पाटील
कोकण विभाग
अनिकेत तटकरे आणि शेखर निकम
यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.