मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने सालाबादप्रमाणे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे हभप रोहिणी ताई परांजपे हस्ते पुजन करुन खारवडे गावाचे सरपंच लक्ष्मण मारणे, संभाजी गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर किर्तनचंद्रिका ह.भ.प रोहिणीताई परांजपे यांचे छत्रपती संभाजी महाराज ह्या विषयावर नारदीय किर्तन, व्याख्यान करण्यात आले.

मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने दरवर्षी संभाजी महाराज जयंती निमित्त पुरस्कार वितरण करण्यात येते यावर्षी मोरया जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सर, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संघटना पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाला मोरया भूषण पुरस्कार, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विश्व शक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त माईंड पॉवर ट्रेनर डॉ.दत्ता कोहिनकर यांनी लिखाणाच्या व व्याख्यानाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या मनोवृत्तीत मुलाखत बदल घडवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे. व्यसनमुक्ती, कौटुंबिक समुपदेशन, कैद्यांसाठी कार्यशाळा, लहान मुलांसाठी कार्यशाळा यासारख्या अनेक गोष्टींवर त्यांनी भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्र शासन व भारत सरकारने देखील यापूर्वी त्यांचा गौरव केला आहे. म्हणून सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मोरयारत्न पुरस्कार डॉ दत्ताजी कोहिणकर यांना प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला मोर्चा माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग कर्मचारी २४ तास उपलब्ध होणारे, पाणी गळती रोखण्यासाठी अग्रेसर असे पाणी पुरवठा विभाग फिटर राजु बळीराम पलमाटे या़ंचा कर्तव्य दक्ष कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला.
याप्रसंगी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा,आयोजित करण्यात आल्या होत्या ह्या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा मधुराताई भेलके, कोथरूड कॉग्रेस अध्यक्ष विजय खळदकर यांच्या हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? राज्यात आणखी एक आघाडी, विरोधी पक्षाची कमतरता दूर करण्यासाठी तीन बडे नेते एकत्र

यावेळी भव्य

राज्यस्तरीय ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धा १४ वर्षांखालील, कोल्हापूर जिल्ह्यातील विश्ववेदा विलास सावंत हिला प्रथम अहमदनगर येथील सोहम वाघस्कर द्वितीय क्रमांक उत्तर सोलापूर सायली गायकवाड हिला तृतीय क्रमांक,

खुला गट

प्रथम योगेन राजेंद्र सावंत (मुंबई),

द्वितीय वैष्णवी शहाजी पवार(इंदापूर)

तृतीय रोहिणी कोठावदे (मुंबई)

उत्तेजनार्थ पारितोषिक तनिष्का पांडुरंग ढवाण (बारामती), प्रतिक शिंदे, प्रणिती पवार,(सांगली) ईशा बोराटे, दिव्या साबळे (शिरुर), अवनीश जाधव,

भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा

खुला गट,

प्रथम क्रमांक रुपाली कापडेकर हिरवे (जुन्नर)

द्वितीय,दिवाकर बडगुजर (जळगाव)

तृतीय क्रमांक,प्रीती गजानन भोज(पुणे)

अधिक वाचा  बीड जिल्हा रुग्णालयात भयंकर परिस्थिती, प्रसुतीवेळी तीन महिलांचा मृत्यू, डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय धडपड?

१४ वर्षांखालील
प्रथम क्रमांक, स्मृतीका पांडुरंग ढवाण (बारामती),

द्वितीय क्रमांक लावण्या सचिन ठाकर,

तृतीय पुर्वा शिंदे

निबंध स्पर्धा उत्तेजनार्थ अवनीश जाधव, यश शितल बनसोडे, मानसी सुरेश पगारे, अस्मिता मेढे, नेहा माळी,

भव्य चित्रकला स्पर्धा

प्रथम क्रमांक- नेत्रा नवनाथ नायकवडी

द्वितीय क्रमांक – सार्थक दर्शन गायकवाड
तृतीय क्रमांक – संचिता काळे,

उत्तेजनार्थ- अवनीश प्रविण मराठे, निलय खेडेकर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले तर आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते. याप्रसंगी बोलताना मारणे म्हनाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची पिढी घडविण्यासाठी आम्ही व्याख्यान, स्पर्धाचे आयोजन करत आहोत छत्रपती चे विचार घराघरापर्यंत पोहचवण्याचे आहे हाच आमचा उद्देश आहे.

अधिक वाचा  मंत्रिमंडळ बैठकीत 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय

यावेळी उस्तव प्रमुख रोहिदास जाधव, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, उपाध्यक्ष रोहन पायगुडे, जगदिश दिघे, आनंद तांबे, खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हर्षल मारणे, राहुल मारणे, अक्षय मारणे, गिरीश भागवत उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शिंदे, विनायक उभे, धनंजय साबळे, स्वाती दारवटकर, पौर्णिमा केसवड, सुरेखा जोशी, रेणुका जावळे, अक्षय केसवड, परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी केले.