धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा आणि भारतीय जनता पार्टी च्या सदस्या सौ.स्वाती शरद मोहोळ यांनी खास महिलांसाठी मोफत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान ज्या पुण्यभूमीमध्ये झाले ते शौर्यपीठ धर्मपीठ तुळापूर येथे सहलीचे आयोजन केले होते.

प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक श्री समीरभाऊ पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती स्मिताताई पाटील यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून सहलीला सुरुवात करण्यात आली. छोट्या मुलांनी महिलांनी आणि वारकरी संप्रदायातील अहवाल वृद्धांनी उस्फूर्तपणे सहलीचा आनंद घेतला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती या उत्साहात आणि आनंदात सगळीकडे साजरी केली जाते. त्याच उत्साहात आणि आनंदात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती सुद्धा साजरी केली गेली पाहिजे असे आवाहन स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ स्वाती शरद मोहोळ यांनी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील चौका चौकातील गणेश मंडळांना पत्रे पाठवून आवाहन केले होते.

अधिक वाचा  महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट; स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते होणार लोकार्पण

गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि नेहमीपेक्षा जास्त ठिकाणी आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची जयंती साजरी झाली.