अनंत करमुसे मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पीएला तडीपार करण्यात आलं आहे. ठाणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आव्हाडांच्या पीएला तडीपार करण्यात आलं आहे. अभिजित पवार असं आव्हाडांच्या पीएचं नाव आहे. अभिजित पवार यांच्या विरोधात अनंत करमुसे मारहाण तसेच इतर काही प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांकडून तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
समोर येत असलेल्या माहिती प्रमाणे जितेंद्र आव्हाड यांचे पीए अभिजित पवार यांच्यावर तडीपारीची करावाई करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून ही करावाई करण्यात आली आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरण आणि इतर प्रकरणात पवार यांच्यावर गुन्हे दाखल असल्यानं त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अनंत करमुसे यांनी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले होते, त्यानंतर 5 एप्रिल 2020 ला त्यांना मारहाण झाली होती. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस तसंच बॉडिगार्डनी आपल्याला बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. यानंतर 6 एप्रिलला करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड हे चांगलेच आडचणीत सापडले होते.