पुणे: खडकवासला धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या आहेत. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आहेत.

कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. दोन मुलींचा शोध अजूनही सुरू आहे.

अधिक वाचा  जिवंत शिवसैनिकाला अखेर स्मशानात जाऊन तिरडीवर झोपावं लागलं, कारण….