कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासीक विजय मिळाला आहे. यानंतर आता कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग अला असून मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यादरम्यान कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ गुरुवारी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गांधी कुटुंबीय आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व ‘समविचारी’ पक्षांना देखील निमंत्रण पाठवले आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाची अंतिम रूपरेषा एक-दोन दिवसांत आकार घेईल, असे सांगण्यात येत आहे.

कालपर्यंत दक्षिणेतील त्यांचा एकमेव बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात आले आहे, या निवडणूकीत काँग्रेसने 224 सदस्यांच्या सभागृहात 135 जागा मिळवल्या आहेत. 2018 च्या राज्य निवडणुकीत भाजपने 104 जागा जिंकल्या होत्या त्यावरून पक्षाच्या आमदारंची संख्या 66 पर्यंत खाली आली आहे. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असलेली एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. कर्नाटकात 51 राखीव मतदारसंघ आहेत, त्यापैकी 36 अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी आणि 15 ST उमेदवारांसाठी आहेत.

अधिक वाचा  दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गरोदर महिला मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच मोठ पाऊल; उद्या पुढची दिशा निश्चित

मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने आज आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्ष (सीएलपी) मुख्यमंत्री निवडीचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर सोपवून ठराव पास करेल अशी अपेक्षा आहे. आज कोणताही अंतिम निर्णय होणार नसून, सर्व आमदारांचे मत जाणून घेतले जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, दीपक बाबरिया आणि जितेंद्र सिंग अलवार यांना कर्नाटक सीएलपी बैठकीचे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदासाठी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागले आहे.

अधिक वाचा  अमरावतीचं माझ्यावर कर्ज, जगाच्या नकाशावर शहराला मिळेल ओळख, विमानतळाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

या दरम्यान सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी त्यांच्या बेंगळुरू येथील घराबाहेर ‘कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करणारे पोस्टर लावले आहेत. शिवकुमार यांच्या घराबाहेर “कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांना” वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्सही लागले आहेत. डि के शिवकुमार यांचा उद्या वाढदिवस आहे.

काँग्रेसचा विक्रमी विजय

काँग्रेसच्या विजय हा 30 वर्षांहून अधिक काळातील जागा आणि मतांच्या टक्केवारीच्या दृष्टीने विक्रमी आहे. पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. या जागा 2018 पेक्षा 55 ने जास्त आहेत तेही 42.88 टक्के मतांसह. या स्कोअरच्या सर्वात जवळ काँग्रेस 1999 मध्ये पोहोचली होती जेव्हा त्यांनी 132 जागा जिंकल्या होत्या आणि 40.84 टक्के मते घेतली होती. 1989 मध्ये काँग्रेसने 43.76 टक्के मतांसह 178 जागा जिंकल्या.

अधिक वाचा  मुख्यमंत्री फडणवीसांच्या १०० दिवस आढावा 6 दिग्गज मंत्री फेल; उपमुख्यमंत्री शिंदेंची धक्कादायक कामगिरी