महाराष्ट्र रिक्षा पंचायत, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान व पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनच्या वतीने ओला उबेर व रॅपिडोच्या बेकायदेशीर चालू असलेल्या ॲपबाबत नुकतेच हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात केस दाखल करण्यात आली होती या दोन्ही केस मध्ये विजय मिळवल्यानंतर हे ॲप बंद करण्याचे आदेश हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने दिले होते, त्यानंतर पुन्हा माननीय हायकोर्टांच्या सूचनेप्रमाणे माननीय रमणाथ झा साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या एग्रीकेटर कंपन्यांना पुन्हा आरटीओ पुणे यांचेकडे आपला अर्ज सादर करण्यासाठीचे आदेश दिले होते परंतु नियमांची पूर्तता न करता आल्यामुळे
पुणे आरटीओ च्या वतीने नुकतेच रिक्षा व टॅक्सी साठी वापरण्यात येणारा ओला उबेर रॅपिडो या कंपनीच्या ॲप साठीची परवानगी नाकारली असून यामुळे आता रिक्षासह चार चाकी वाहनातून होणारी प्रवासी वाहतूक ओला उबेर रॅपिडो या कंपनीची बेकायदेशीर रित्या चालू असून ती केव्हाही बंद होऊ शकते, परंतु रिक्षा चालकांसाठी व प्रवाशांसाठी मोबाईल टेक्नॉलॉजी ॲप अत्यंत उपयुक्त असल्याने हा ॲप प्रवासी आणि रिक्षाच्या सेवेमध्ये सरकारच्या वतीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पुण्यातील सर्व रिक्षा संघटनांनी एक मुखाने केली असल्याची माहिती ऑल इंडिया ऑटो रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व कृती समितीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे व समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांनी दिली. मोबाईल एप्लीकेशन बाबत निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीबाबत पुणे शहरातील सर्व संघटनांनी पुणे येथील महामाता रमाई स्मारक येथे बैठक आयोजित केली होती.
भाजप वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अंकुश नवले हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, या बैठकीत समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक व पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष किशोर चिंतामणी, आम आदमी पक्षाचे पुणे शहर संघटक व सत्यसेवा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले, शिवनेरी रिक्षा संघटनेचे संस्थापक आबा बाबर, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रदीप भालेराव, रिक्षा फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रकाश झाडे, रिक्षा फेडरेशन चे ज्येष्ठ नेते पोपटराव कांबळे, रिक्षा संघटनेचे ज्येष्ठ नेते असगर बेग, उद्योजक पंकज जैन, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे सदस्य गणेश रासने, शिवकल्याण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ मारणे , श्री समर्थ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कडू, संयुक्त कृती समितीचे सदस्य तुषार पवार, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे सदस्य रुपेश भोसले,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.