कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 224 जागांपैकी जवळपास 135 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला फक्त 65 जागांवर विजय मिळाला. जेडीएसला केवळ 19 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसनं कर्नाटकात जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपला मात्र, सत्ता राखण्यास यश आलं नाही.

कर्नाटक निवडणुकीत बेळगावमधील तीन भावांचा विजय झाला आहे. त्यामुळे या तीन भावांची संपूर्ण कर्नाटकमध्ये चर्चा होत आहे. या तीन भावांपैकी दोघांनी काँग्रेसकडून तर एकाने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. यामध्ये सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला. ते यमकनमर्दी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी जवळपास 60.42 टक्के मते मिळवली आहेत.

अधिक वाचा  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना पुरस्कार; शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव

तर भालचंद्र जारकीहोळी हे अरभावी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार भीमप्पा गुंडप्पा गडग यांचा पराभव केला आहे.

तर रमेश जारकीहोळी यांनी गोकाक विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. याआधी देखील तेच या मतदारसंघातून निवडून आले होते. दरम्यान, कर्नाटकच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचा मोठा दबदबा आहे. जारकीहोळी हे पाच जण भाऊ असून यापैकी चार भाऊ राजकारणात सक्रीय आहेत. जारकीहोळी बंधूंची साधी राहणी पण राजकारणावर मोठी पकड आहे