मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023च्या सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, भाजप आणि जनता दलाला अपेक्षित अशी आघाडी मिळवता आलेली नाही. यावरून विरोधी पक्षांनी भाजपला घेरत टीका करणे सुरू केलं आहे. याच्या आधी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते जातील तेथे भाजप हारतं असं म्हटलं होते. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट मे आ गया’ असं म्हणत भाजपवर चांगलीचं टीका केली आहे. तर ‘मोदी है तो मुनकीन है’ असे म्हणनाऱ्या लोकांना कर्नाटकचा हा निकाल भक्तजनांसाठी चपराक आहे. तर ज्या राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेल ने पप्पू म्हणून हिणवलं ते तर सर्वांचे बाप निघाले. तसेच यावेळी त्यांनी, फडणवीस यांना लक्ष्य करताना, फडणवीसांनी कर्नाटकात जाऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गरज नसताना बजरंगबलीचा मुद्दा फडणवीसांनी काढला. या सगळ्याचा तिथे अजिबात फायदा झाला नाही. त्यामुळे आता असे कार्ड ते महाराष्ट्रात वापरताना दहा वेळा विचार करतील, शब्दांत अंधारेंनी भाजपसह फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

…….
भाजप काँग्रेसच्या कर्नाटकातील चुरशीच्या लढाईत राहुल गांधींचे सूचक ट्विट

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. मतमोजणीला ८ वाजता सुरुवात झाली आहे. सुरुवातील हाती आलेल्या निकालासमोर काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूचक ट्विट केलं आहे. आज मी थांबू शकत नाही, असं ट्विटमध्ये म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यांनी त्यांचा प्रचारादरम्यानचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस ११६ जागांवर आघाडीवर आहे.

अधिक वाचा  ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंची भूमिका काय? ट्रेलर पाहून म्हणाले..

काय आहे ट्विट?

मी अजिंक्य आहे

मला खूप विश्वास आहे

होय, आज मी थांबू शकत नाही

विधानसभेच्या संपूर्ण २२४ जागांसाठी मतदान पार पडलं. एक्झिट पोलनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. . निवडणुकीत काँग्रेस १०६ ते १२० जागा जिंकेल, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेला आहे.

कर्नाटक सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११३ इतका आहे. तसंच मतांच्या टक्केवारीतही काँग्रेस भाजपला मागे टाकेल, असं अंदाज आहे.
…….
आवारेंच्या खून कटात राष्ट्रवादीचे आमदार शेळके? राजकीय वैमनस्याची फिर्याद; गुन्हाही दाखल

तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषद कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. १२) भरदुपारी जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (वय ५०) यांचा खून झाला आहे. जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे.या खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार सुनील शेळके यांनी किशोर आवारेंचा खून केल्याचा आरोप आवारेंच्या आईंने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.याप्रकरणी आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून सहा जणांच्या टोळक्याने निर्घृण खून केला. ही घटना दुपारी पावणे दोनच्या सुमारास नगरपरिषदेच्या आवारात घडली होती. पोलीस पथक तपास करीत आहे.

अधिक वाचा  भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या 61व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, नेत्याची होणारी बायको कोण?

१ एप्रिलला मावळातच प्रति शिर्डी शिरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही आवारेंसारखीच निर्घूण हत्या झाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तीन मारेकऱ्यांनी डोक्यात कोयत्याचे घाव घालून साई मंदिरासमोरच गोपाळेंचा खून केला होता. खून करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी घटनास्थळाची रेकी केली होती. पाळत ठेवून त्यांनी हल्ला केला होता. तसेच आवारेंवरही पाळत ठेवून दबा धरून त्यांना मारण्यात आले.
…..
आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून आंबेडकरांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला; तुम्हीं “महिन्यानंतर…”

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) निकाल दिला. त्यात शिवसेनेतील बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी कालावधीत (विदीन रिजनेबल टाईम’ Within Reasonable Time) निर्णय देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत. मात्र नार्वेकर यांनी लवकरात लवकर म्हणजे काही कालमर्यादा नाही, अशी भूमिका घेऊन ठाकरे गटाचे टेन्शन वाढविले आहे. त्यामुळे या प्रकरणी ठाकरे गटावर वाट पाहण्याची वेळ येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. आबेंडकर आकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अधिक वाचा  नवीन समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न सुरू ‘शरद पवार अन् अजितदादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही’, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

आंबेडकर म्हणाले, “सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायानुसार १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्षांना घ्यावयाचा आहे. त्यासाठी वेळेचे कसलेही बंधन नाही. परिणामी या प्रकरणावर निर्णय घेण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता सभापतींना निर्णयासाठी महिनाभराची वेळ द्यावी. महिनाभरात निर्णय झाला नाही तर विधिमंडळ आणि अध्यक्षांना घेराव घालावा.

यावेळी आंबेडकरांनी ठाकरे यांना कायम पाठिंवा असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकर म्हणाले, आता उद्धव ठाकरे हे पुढील काही दिवसात कोणती भूमिका घेतात, यावरच राज्याचे राजकारण अवलंबून आहे. उद्धव ठाकरे यांना मित्र पक्ष म्हणून सल्ला देत आहे. सध्या ते गोंधळलेले आहेत. गोंधळेलेल्या व्यक्तीलाच सल्ला दिला जातो. या सर्व घडामोडीत वंचित बहुजन आघाडी या संघर्षात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहे.

आता पुर्वीप्रमाणे कोर्टातील महत्त्वाच्या निकालांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, पूर्वी ८० च्या दशकात न्यायालयाच्या महत्त्वाच्या निर्णयांवर सार्वजनिक चर्चा होत असे, भाष्य केले जात होते. आता ही प्रथा बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू झाली पाहिजे. सार्वजनिकरित्या निकालावर चर्चा घडून आल्या पाहिजेत.