राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. सतत राज्यातील राजकीय पेचप्रसंगाचा सामना करावा लागणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी पूर्ण केली आहे. या परीक्षेमध्ये त्यांना 77% गुण मिळाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार म्हणूनही ओळखले जाणार आहेत.

कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी बुधवारी संध्याकाळी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांना प्रमाणपत्र दिले. एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विद्या व जन संज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाची बी.ए. पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून घेतले असून पत्रकारितेचा पदविका शिक्षणक्रम ऑगस्ट 2021 मध्ये विशेष प्राविण्यासह अर्थात 77.25 टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला.

अधिक वाचा  सिंहगड पहिल्या दिवशीच चालकांनी केला चक्काजाम; पालक संतप्त संस्थेकडून थेट सुट्टी जाहीर

विद्यापीठाचा नावलौकिक वाढला

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे ध्येय व स्वप्न पूर्ण करणाऱ्या नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एकनाथ शिंदे यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या या यशाने विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना विशेष आनंद होत असल्याचे कुलगुरूंनी नमूद केले.

यापूर्वी शिंदे यांनी वायसीएमओयूमधून बीए केले आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी पदवी आणि मानवाधिकार विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचेही लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा सदंर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर प्रतिक्रिया दिली.

अधिक वाचा  तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’