कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष किंगमेकर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. कर्नाटकमध्ये आज मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे.
न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोलनुसार,
भाजप 114 जागा ( स्पष्ट बहुमत)
काँग्रेसला 86 जागा
जेडीएसला 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तीन जागा इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.
रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू एक्झिट पोलनुसार
भाजपला 85-100 जागा
काँग्रेसला 94-108 जागा
जेडीएसला 24-32 जागा मिळू शकतात आणि इतरांना 2-6 जागा मिळू शकतात.
सुवर्ण न्यूज-जन की बात एक्झिट पोलनुसार
भाजपला 94-117 जागा
काँग्रेसला 91-106 जागा
जेडीएसला 14-24 जागा मिळतील आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.
टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्ट्रेट एक्झिट पोलनुसार
भाजपला 88-98 जागा
काँग्रेसला 99-109 जागा
जेडीएसला 21-26 जागा
इतरांना 0-4 जागा मिळू शकतात.
टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार
भाजपला 78.-92 जागा
काँग्रेसला 106-120 जागा
जेडीएसला 20-26
इतर पक्षांना 2-4 जागा मिळण्याची शक्यता आहे.
झी न्यूज मॅट्रिज एजन्सीच्या एक्झिट पोलनुसार
भाजप 79-94 जागा
काँग्रेस 103-118 जागा
जेडीएसला 25-33 जागा
इतर आणि अपक्ष 2-5 जागा जिंकू शकतात.
इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार
भाजपला 62 ते 80 जागा
काँग्रेसला 122 ते 140 जागा
जेडीएसला 20 ते 25 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.