मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुफान चर्चा रंगली. शिवाय सिनेमाला विरोध देखील करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यांनी बंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. पण होणाऱ्या वादाचा कोणताही परिणाम सिनेमावर झाला नाही. आजही अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. पण तरी देखील बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करताना दिसत आहे.
सिनेमाचा आकडा थक्क करणारा आहे. बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा दबदबा दिसून येत आहे. सिनेमा देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, काही ठिकाणी तर सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. पण काही ठिकाणी सिनेमा बॅन करण्यात आला आहे. असं असताना देखील सिनेमाने पाच दिवसांत ५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
‘द केरळ स्टोरी’ सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने ८ कोटींची कमाई केली. सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण ३५ कोटींची कमाई केली. सोमवारी सिनेमाने तब्बल जवळपास ११ कोटींची कमाई केली, ज्यामुळे सिनेमाचं कलेक्शन ४६ कोटी रुपयांवर पोहोचलं. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी ११ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. अशा प्रकारे सिनेमा ५ दिवसात ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
आता ‘द केरळ स्टोरी’ १०० कोटी रुपयांपर्यंत कधी पोहोचतो यावर निर्मात्यांचं लक्ष आहे. दिग्दर्शक सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. सिनेमात अदाह शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
नक्की काय आहे ‘द केरळ स्टोरी’ ?
‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२ हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.