राजकारणातल्या चोरांना मोदी पकडतात. पकडायचे हे बरोबर आहे, मात्र पूर्णत्वास न नेता त्यांना तीन-चार वर्षे जेलमध्ये ठेवून भीतीचे वातावरण निर्माण करायचे. हा सगळा भाग म्हणजे मानसिक दृष्टीकोनातून माणसे सक्षम नाहीत. उद्या केंद्रातील भाजपची सत्ता गेली नरेंद्र मोदी यांनाही याचप्रमाणे तुरुंगात जाऊ शकतात. त्यामुळे मोदी यांनी जे पेरले आहे तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पिंपरी येथील वडार समाजाच्या महामेळाव्यासाठी सोमवारी (ता. ८) आंबेडकर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ॲड. आंबेडकर म्हणाले की, “कर्नाटकच्या सभेत दुभाषी माझ्या भाषणातील मोदी, भाजप शब्द भीतीमुळे घाबरत होता. मात्र; मी त्याला सांगितले की मोदी हे लोकांनी निवडून दिलेल्या माणसाचे प्रतिनिधी आहेत. खरे मालक हे मतदार आहेत त्यामुळे मतदारांनी घाबरू नये.

अधिक वाचा  झहीर खान आणि सागरिकाच्या घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन, नाव आहे एकदम युनिक

अजित पवार भाजपात जातील का या प्रश्नाला उत्तर देताना देताना ॲड. आंबेडकर म्हणाले, “कुणाला कधी कुठे मुख्यमंत्री पद चिटकेल त्याच्यावर अवलंबून आहे.” यानंतर त्यांनी वडार समाजाला मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. भटक्या विमुक्तांमध्ये वडार समाज हा ४० टक्के आहे. वडार समाजाची अवस्था ही खालवलेली आहे. शासनाने या समाजाला इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी शिक्षणाच्या संधीबरोबरच कला जोपासणाऱ्या समाजाला कर्जाच्या रुपाने नाही तर अनुदानाच्या रुपाने मदत केली पाहिजे, असेही मत डॉ. आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.