देशात सर्वत्र भारतीय जनता पक्षाचा बोलबाला असतानाही आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे लक्षात असतानाही भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मध्य प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कायम निष्ठावान लोकांना दुर्लक्षित करणारी नवी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेतली जात असल्यामुळे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे पुत्र दीपक जोशी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.

सध्या केंद्रात आणि राज्यात जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी व पक्षाला चुकीचे दिवस आल्यानंतर यामध्ये सहभागी होण्यासाठी बाहेरील पक्षातील आलेले पदाधिकारी हेच डोळे जवळ झाल्याने मूळ भाजपचे निष्ठावान पदाधिकारी दीपक जोशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  कुणाल कामराला मोठा दिलासा; बजावलेल्या नोटीसीतील मोठी चूक पथ्यावर शिंदे प्रकरणी अटकेपासून संरक्षण हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

केंद्रीय स्तरावर ती भारतीय जनता पक्षाच्या वतीने भ्रष्टाचार मुक्त राज्यकारभार करण्याची घोषणा दिली जात आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे मोठे कार्यक्षेत्र असलेले आणि हमखास विजय देणारे राज्य म्हणून मध्य प्रदेश ओळखले जात आहे; परंतु सध्या या राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला असून बागलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे मला वाईट वाटले आहे. मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असे ते म्हणाले.

मध्यप्रदेश मध्ये या वर्षअखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दरम्यान जोशी यांच्या प्रवेशामुळे भाजपाला धक्का तर काँग्रेसला बळ मिळाले आहे. आगामी काळामध्ये असेच धक्कादायक प्रवेश काँग्रेस पक्षांमध्ये होणार असून सध्याचा राज्यकारभार हा मिलके खाऊ असा प्रकारचा झाला असून याला जनता उत्तर देईल असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  ब्लुमबर्गचे पहिले भारतीय सल्लागार ठरले सुरेश प्रभू