पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. कुरुलकर यांची गुप्तचर यंत्रणेकडून (रिसर्च अँड ॲनलसिस विंग- रॉ) चौकशी करण्यात येत आहे.

पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत राष्ट्रप्रेमाचे धडे गिरवलेले शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर नेमके आहेत कोण? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

कुरूलकरांचा संघाच्या शाखेशी संबंध…

देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोपाखाली अटक असलेले प्रदीप कुरुलकर यांनी ‘नूमवीय’ या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलगा हा देखील सहभागी झाले होते. या मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या संघातील शाखेतील दिवसांबद्दल माहिती दिली आहे.

अधिक वाचा  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर वेगवेगळ्या विविध पातळींवरुन कारवाई; ‘या’ शिफारशींमुळे रुग्णालय मोठ्या अडचणीत

कुरूलकर त्यांच्या मुलाखतीत सांगतात की, माझा मुलगा आता संघकार्यात जातो, ही आमची चौथी पीढी आहे. माझे आजोबा प्रभात शाखेत फक्त जायचे. त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं. ते अतिशय चांगले गणिती होते. त्यांचे हिशोब पक्के असल्याने शाखेची गंगाजळी, टिपणं ठेवणं असं काम त्यांच्याकडं होतं. ते काम नंतर वडिलांकडे आलं. ते गणित आणि विज्ञानाचे शिक्षक होते, असंही कुरूलकर या मुलाखतीत सांगतात.

त्यांनी पुढे या मुलाखतीमध्ये सांगितलं की, बंगळूरूवरून पुण्यात येऊन संघघोष शिकणारे सुब्बू श्रीनिवास हे मला पहिल्यांदा शाखेत घेऊन गेले. त्यांचा हात धरून मी मोतीबागेत गेलो.

तसेच वयाची पाच वर्ष पूर्ण झाल्यापासून ते शाखेत जात असल्याचंही त्यांनी मान्य केलं. तेव्हा रस्ता ओलांडताना मदत लागायची, कोणीतरी घेऊन जायचं, नंतर रस्ता ओलांडून स्वतंत्र्यपणे जाता यायला लागलं तेव्हापासून तो संध्याकाळच्या माझ्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग होता, असे कुरुलकर म्हणतात. अनेक वर्ष मी संघशिक्षा वर्ग झाल्यानंतर प्रचारकांची बैठक असे, त्याची सुरूवात बाबाराव भिडे करायचे. काही वर्ष मी त्यांच्या बौध्दिकांची टिपणं काढण्याचं देखील काम केलं आहे असेही त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर! खेळाडू मालामाल! ही नावं वगळली या नव्या चेहऱ्यांचा समावेश संपूर्ण यादी

शिक्षण आणि कारकिर्द

मींटने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रदीप कुरुलकर यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (DRDO) चा एक भाग असलेल्या संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) [R&DE(E)] च्या सिस्टम्स अभियांत्रिकी प्रयोगशाळेत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१९६३ मध्ये जन्मलेल्या प्रदीप कुरुलकर यांनी १९८५ मध्ये सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (BE) पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये CVRDE, Avadi येथे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये आपली कारकिर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमधून ड्राइव्ह आणि अॅप्लिकेशन्सवर लक्ष केंद्रित करत पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पुढील शिक्षण सुरू ठेवलं.

अधिक वाचा  ‘यूपीएससी’त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

कुरुलकर हे रॉकेट लाँचर, लष्करी अभियांत्रिकी उपकरणे, अडव्हांस रोबोटिक्स आणि लष्करी वापरासाठी मोबाइल मानवरहित प्रणाली डिझाइन आणि विकसित करण्यात तज्ञ आहेत.

प्रमुख डिझायनर आणि टीम लीडर म्हणून अनेक लष्करी अभियांत्रिकी उपकरणे आणि सीस्टम्स विकसित आणि डिझाइन करण्यात कुरुलकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामध्ये हायपरबेरिक चेंबर्स, हाय प्रेशर Pneumatic सीस्टम्स, मोबाईल पॉवर सप्लाय आणि AD, MRSAM, निर्भय सबसोनिक क्रूझ मिसाइल सिस्टम, प्रहार, QRSAM आणि XRSAM सारख्या विविध प्रोग्राम्ससाठी क्षेपणास्त्र प्रक्षेपक यांचा समावेश आहे.