बंगळूर : भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांच्यावर चोरीचा आरोप सिद्ध झाला असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्तापूर येथील प्रचारसभा रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघात सहा मे रोजी पंतप्रधान मोदी जाहीरसभेला उपस्थित राहणार होते. ती आता रद्द करण्यात आली आहे. चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

या निर्णयावरून विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. आता राठोड यांच्यावरील चोरीचा आरोप सिद्ध झाल्याने भाजपला खडबडून जाग आली आहे. चित्तापूरमध्ये राठोड यांचा मोदी प्रचार करणार होते. काळसंते येथील अंगणवाडीतील मुलांसाठी दूध पावडर विकल्याप्रकरणी मणिकांत राठोड यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

अधिक वाचा  अरबी समुद्रात हालचालींना वेग, पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव, भारतीय नौदलही सज्ज

राठोड यांनी न्यायालयात अपील दाखल केल्याचं कळतं. या स्थितीत मणिकांत यांचा मोदींनी प्रचार केला तर भाजपला गोत्यात येऊ शकतो. 28 एप्रिल रोजी बोम्मई यांनी चित्तापूरमध्ये राठोड यांच्यासाठी रोड शो आयोजित केला होता. मुख्यमंत्र्यांनी अशा उमेदवारासाठी मतांची भीक मागणे, ही शोकांतिका असल्याचं काँग्रेसनं सांगितलं.