राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे.
‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत होते. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय मागे घेतला आहे.

या निर्णयावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली भूमिका मांडली आहे. याला खेळी म्हणता येणार नाही : अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाला अनेकजण खेळी म्हणत आहेत. पण, या दाव्याला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी फेटाळले.

अधिक वाचा  माफी मागा ते 36 हजार कोटी आम्हाला द्या; बांगलादेशने आता पाकिस्तानकडे मोर्चा वळवला! नेमकं प्रकरण आहे तरी काय?

याला खेळी म्हणता येणार नाही. सामन्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांनी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी मजबूतच आहे. वज्रमुठ मजबूत आहे, असंही दानवे म्हणाले.

दानवेंची भाजपवर टीका महाराष्ट्राने बघितले आहे ज्यांचे बोट धरून मोठे झाले त्यांच्याशी गद्दारी करून मोठे झाले. गद्दाराना घेऊन पुन्हा येईन हे त्यांना लखलाभ. गद्दारांना घेऊन काय होते ते महाराष्ट्र बघत आहे. स्वतःच्या ताकदीवर पक्ष मोठा करता येत नाही.

म्हणून दुसऱ्याचे पक्ष फोडणे सुरू आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्यावर केली. बारसु आणि कोकणातील जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. स्थानिक लोकांशी संवाद साधून त्या भावना महाराष्ट्रासमोर आणतील. राणेंच्या बापाचे कोकण नाही. राणेंच्या घरची जहांगीर कोकण नाही. राणेंना कोकणच्या जनतेनेच पाडले आहे. त्यांची ताकद आता राहिली नाही, अशी टीका दानवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली.

अधिक वाचा  पहलागाम दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय, श्रीनगरहून 2 जादा उड्डाण आणि ‘या’ सेवा मोफत

सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर
शरद पवारांचा राजीनामा ‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या याचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

अधिक वाचा  श्री रामेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा नांदेड गावात उत्साहात शुभारंभ; विश्वासहार्य पारदर्शी कारभारामुळे पुन्हा ‘विजयी’चा संकल्प