अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून केरळ स्टोरी या चित्रपटाविषयी बोलताना दिसत आहे.
चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल यांचा ‘द केरळ स्टोरी’ सध्या चर्चेत आहे. या चर्चा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सुरु होत्या. आज ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.
एका यूजरने चित्रपटाविषयी बोलताना म्हटले की, “द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा एक भाग होण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने पाहायला हवा. इतका धाडसी चित्रपट बनवल्याबद्दल विपुल शाह आणि सुदिप्तो सेन जी तुमचे आभार” असे म्हटले आहे.
दुसऱ्या एका यूजरने ‘हे केरळचेच नव्हे तर आपल्या समाजाचे काळे सत्य आहे! हा चित्रपट अवश्य पाहा’ असे ट्वीट केले आहे.
तिसऱ्या एका यूजरने सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू देत म्हटले की, ‘मी नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट करण्यामागे दिग्दर्शकांचा कोणताही हेतू दिसत नाही. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. अनेकांनी याला सहमती दर्शवली आहे.’
काय आहे चित्रपटाची कथा?
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ३२००० हजार महिला अचानक केरळमधून गायब होऊन आयसीसमध्ये कशा सामिल झाल्या हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात अदा शर्मा ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने एक हिंदू मल्याळी नर्सची भूमिका साकारली आहे. ही नर्स अचानक केरळमधून गायब झाली होती. तिला जबरदस्ती इस्लाम धर्म स्विकारण्यास सांगण्यात येतो आणि जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आयसीसमध्ये शामिल करण्यात आले. सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात चार सर्वसामान्य कॉलेजमधील मुलींना जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आले हे दाखवण्यात येणार आहे.