सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शाह आणि गुलशन देवा यांची मुख्य भूमिका असलेला ‘दहाड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

दरम्यान दहाडचे प्रमोशनही मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. काही दिवसांपासून अभिनेता विजय वर्मा आणि टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या अफेयरची, डेटिंगची चर्चा रंगली आहे. या दोन्ही सेलिब्रेटींना यावरुन प्रश्न विचारले असता त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही. त्यावर बोलणेही टाळले आहे. अशावेळी सोनाक्षी सिन्हानं जेव्हा विजयला तमन्नावरुन छेडले तेव्हा त्याने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

अधिक वाचा  पुण्यात भाजप VS काँग्रेस यांच्यात राडा, भाजपचे आंदोलक प्रचंड आक्रमक; पोलिसांनी केलं स्थानबद्ध

सोनाक्षी सिन्हाने तमन्नावरुन छेडल्यावर विजयची प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली. विजयनं भलेही शब्दांतून त्याच्या भावना व्यक्त केल्या नसतील पण त्याच्या चेहऱ्यावरील ते हास्य खूप काही सांगून गेले. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यातून असे दिसून येते की, विजय आणि तमन्ना हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या प्रतिक्रिया तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्नाच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे.