राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.5 मे ) आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला. शरद पवार यांनी आज मुंबईतील वाय.बी.सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका मांडली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवारच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांना एक प्रश्न विचारण्यात आला. पक्षातील अनेकांना भाजपमध्ये जायचं आहे, असं पवारांनीच पुस्तकात लिहिलं आहे आणि आता त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला याचा अर्थ तुम्हाला जे करायचंय ते करा; असं पवारांना सूचित करायचं आहे का? असा प्रश्न जयंत पाटलांना विचारण्यात आला.

अधिक वाचा  अनुराग कश्यप का भडकला, म्हणाला… भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’

या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक पक्षात असू शकतात. परंतु त्यांची संख्या मर्यादित असेल. मात्र माझ्यासमोर अशी भूमिका कुणीही व्यक्त केलेली नाही, असा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला आज विस्तार करण्याची संधी आहे. राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महाविकास आघाडी तुटावी असं कुणाला वाटत असेल तर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले.