बॉलिवूडचे जयकांत शिक्रे अशी ओळख असणारे अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. प्रकाश राज हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विविध विषयांवर मतं मांडत असतात. प्रकाश राज यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. नुकतेच प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरचा एक एडिट केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

प्रकाश राज यांचे ट्वीट

प्रकाश राज यांनी हिटलर आणि नरेंद्र मोदी यांचा लोकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘इतिहासाची पुनरावृत्ती.. काटेरी तारांमागे भविष्य आहे.. सावधान..’ प्रकाश राज यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. प्रकाश राज यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरसोबत केली का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

अधिक वाचा  निधी वादावर ‘एकनाथ शिंदे एक दिवस अजितदादांना थेट कॅबिनेटमध्येच जाब…’ भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या फोटोला अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘सर… ते ठीक आहे पण, दोन्ही फोटोतील मुलांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहा’.तर काही नेटकऱ्यांनी फोटोला कमेंट करुन प्रकाश राज यांना ट्रोल केलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी द कश्मीर फाईल्स या चित्रपटावर देखील टीका केली. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, ‘द कश्मीर फाइल्स हा एक नॉनसेन्स चित्रपट आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्याच्यावर थुंकतात. ते अजूनही निर्लज्ज आहेत. दिग्दर्शक अजूनही सांगत आहे, ‘मला ऑस्कर का मिळत नाही?’ त्याला भास्कर पुरस्कारही मिळणार नाही.’

अधिक वाचा  बीड जिल्हा रुग्णालयात भयंकर परिस्थिती, प्रसुतीवेळी तीन महिलांचा मृत्यू, डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय धडपड?

प्रकाश राज यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.त्यांनी सिंघम या चित्रपटात साकरलेल्या जयकांत शिक्रे या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच त्यांनी वारिसू, केजीएफ, वॉन्टेड या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘नवरस’ या चित्रपटात देखील त्यांनी काम केलं.